पाईट येथील दरेकर यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईट येथील दरेकर यांना
शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
पाईट येथील दरेकर यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

पाईट येथील दरेकर यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

sakal_logo
By

पाईट, ता. ७ : येथील भानुदास मारुती दरेकर यांना कृषी विभागातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ, नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

दरेकर यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत पेप्सिको कंपनीबरोबर करार शेती, अत्याधुनिक मॉडेल फार्मची निर्मिती, दुग्धव्यवसाय, अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कुक्कुटपालन व्यवसाय, फळबाग लागवड, कांदा चाळ, शेततळे, ठिबक व तुषार सिंचन, गांडुळ खत व नॉडेप युनिट, बायोगॅस संयंत्राची उभारणी तसेच बटाटा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. याची नोंद बायर क्रॉप सायन्स या केमिकल कंपनीच्या इंटरनॅशनल मासिकामध्ये करण्यात आली. त्यांना खेड तालुका उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी, मंडल अधिकारी विजय पडवळ यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00538 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top