पाईट सोसायटी निवडणुकीत 12 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात-भटक्या विमुक्त जागेवर दिगम्बर जांभळे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईट सोसायटी  निवडणुकीत 12 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात-भटक्या विमुक्त जागेवर दिगम्बर जांभळे बिनविरोध
पाईट सोसायटी निवडणुकीत 12 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात-भटक्या विमुक्त जागेवर दिगम्बर जांभळे बिनविरोध

पाईट सोसायटी निवडणुकीत 12 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात-भटक्या विमुक्त जागेवर दिगम्बर जांभळे बिनविरोध

sakal_logo
By

पाईट सोसायटीच्या निवडणुकीत
बारा जागांसाठी २६ उमेदवार

पाईट, ता. ११: पाईट सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. तर भटक्या विमुक्त या जागेवर दिगंबरविलास जांभळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. येत्या १६ मे रोजी निवडणूक होणार आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनवखंडेनाथ शेतकरी विकास पॅनेल असून, त्यांच्या विरोधात सर्व पक्षीय श्रीनवखंडेनाथ महाराज शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या तरुणांनी तगडे आव्हान उभे केले आहे. पाईट सोसायटी ही पश्चिम पट्ट्यातील सर्वांत मोठी सोसायटी आहे. सोसायटीत पाईट गावठाण तसेच वाड्या वस्त्या, अहिरे, हेद्रुज, पाळू, रौंधळवाडी येथील सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदार राजाचे मन वळविण्यासाठी उमेदवारांना रणरणत्या उन्हात प्रचार करावा लागत आहे. सध्या दोन्ही पॅनेलतर्फे कोपरा सभा, रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोसायटी निवडणुकीत यापूर्वीचे संचालक पंडित रौंधळ, रामदास सावंत, शंकर महादू रौंधळ,अश्विनी रौंधळ, नवनाथ दरेकर, मच्छिंद्र ऊर्फ अनिल डांगले हे पुन्हा रिंगणात उतरून नशीब अजमावणार आहेत. तर दिगंबर जांभळे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी यासाठी १७ , महिला प्रतिनिधीसाठी ४, इतर मागासवर्गीय साठी २, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून ३ असे एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00547 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top