
आमदार मोहिते पाटील यांचे आडगाव सोसायटीवर वर्चस्व
पाईट, ता. १२ : आडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वर आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले असल्याचे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले. सदर निवड राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पार पडली.
या सोसायटीमध्ये आडगाव, सुपे-सातकर वाडी, वाघू-साबळेवाडी, टेकवडी या गावांतील सभासदांचा समावेश आहे. या निवडणुकीत मोहन शंकर गोपाळे, संदीप चिंतामण गोपाळे, शंकर कृष्णा गोपाळे, सुरेश धोंडू घुले, प्रमोद सातकर, निर्मला सातकर, कोंडाबाई खेडेकर, शंकर साबळे, फक्कड बुढे या व इतरांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सतीश चांभारे, शिवराम साबळे, बबन गोपाळे, दत्तात्रेय मुके, शांताराम गोपाळे, सचिन चांभारे, विठ्ठल शिंदे आदिनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे.बी.मुलाणी व सहायक म्हणून संस्थेचे सचिव लक्ष्मण धोंडू शिंदे यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवडून आलेले सोसायटी संचालक पुढील प्रमाणे : सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी प्रवर्ग- भाऊसाहेब सावळेराम पानमंद, जितेंद्र गणपत गोपाळे, लक्ष्मण सीताराम गोपाळे, सतू पुनाजी गोपाळे, सतीश प्रभाकर मोहन, चिंधू लक्ष्मण पिसाळ, विष्णू भागू साबळे, संजय दत्तू बेंडूरे.
महिला प्रतिनिधी प्रवर्ग- सगुणाबाई बबन लिंबळे,कांताबाई साहेबराव सातकर.
इतर मागास वर्ग प्रवर्ग- अरुण सीताराम चांभारे. अनुसूचित जाती प्रवर्ग- उल्हास विठ्ठल बुढे तसेच भटक्या विमुक्त प्रवर्ग ही जागा रिक्त राहिली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00549 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..