पाईट सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित रौधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईट सोसायटीच्या 
अध्यक्षपदी पंडित रौधळ
पाईट सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित रौधळ

पाईट सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित रौधळ

sakal_logo
By

पाईट, ता. ३ : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडित बारकू रौधळ, तर उपाध्यक्षपदी ताराबाई तुकाराम बच्चे यांची बिनविरोध निवड झाली. या सोसायटीवर आमदार दिलीप मोहिते यांचे वर्चस्व कायम राहिले असल्याचे इतर सर्व सन्माननीय संचालकानी सांगितले. या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन राजगूरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात केले होते. निवडीच्या वेळी सोसायटीचे १३ संचालक उपस्थित होते. सदर निवडीच्या वेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक-एक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांबळे यांनी दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. या सोसायटीमध्ये पाईट गावठाण व वाड्या वस्त्या, अहिरे, हेद्रुज, रौधळवाडी, पाळू या गावांतील सभासदांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक हरिचन्द्र कांबळे व सहायक म्हणून पाईट सोसायटीचे सचिव सुनील रौधळ यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00565 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top