पाईट येथे वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाईट येथे वाहतूक ठप्प
पाईट येथे वाहतूक ठप्प

पाईट येथे वाहतूक ठप्प

sakal_logo
By

पाईट, ता. १३ : पाईट गावच्या पश्चिमेकडील (आंबोली रोडवरील) पुलावरून ३ ते ४ फूट पाणी असल्याने सुमारे ३० गावची वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावाच्या ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.त्यामुळे सदर पुलाची उंची वाढवण्याची मागणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अनेकदा पाईट ग्रामपंचायत ने बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून देखील सदर पुलाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
गेली महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पश्चिम पट्ट्यातील बळीराजा सुखावला आहे. मात्र या सुखद धक्क्याने काही भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे.
याचाच एक भाग म्हणजे पाईट गावच्या पश्चिम कडील पुलावरून आज पहाटेपासून सुमारे ३ ते ४ फूट पाणी वाहत असल्याने पाईटच्या करंडेवाडी, माळवाडी सह पाळू, अनावळे, टेकवडी, आडगाव, सुपे-सातकर वाडी, घोटवडी, परसुल, खरपूड, आंबोली, वांद्रा, विराम, भलवडी, गडद, आंभु या व इतर गावच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
संपर्क तुटलेल्या गावांतील दूध गवळी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्ण, प्रवाशी यांची गैरसोय झाली असल्याचे करंडेवाडी येथील माजी उपसरपंच अनंता करंडे, सुंदर करंडे, पाईट सोसायटी संचालक विजय करंडे, कैलास करंडे, योगेश राहाणे, नाथा करंडे व इतरांनी सांगितले.
01366

Web Title: Todays Latest District Marathi News Pat22b00580 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..