टेकवडी येथे ज्येष्ठांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेकवडी येथे ज्येष्ठांचा सन्मान
टेकवडी येथे ज्येष्ठांचा सन्मान

टेकवडी येथे ज्येष्ठांचा सन्मान

sakal_logo
By

पाईट, ता. २० ः टेकवडी (ता. खेड) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजवंदन वीरमाता अरुणा ज्ञानेश्वर राळे, माजी सैनिक संदीप होले यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाईट पोलिस स्टेशनचे अमोल डेरे, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे माजी अध्यक्ष अजित वाळुंज व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात तरुण मंडळाने गावातील १०५ ज्येष्ठांचा सन्मान तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान बालवाडी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तर व टिफीन बॉक्सचे वाटप, वीरमाता अरुणा ज्ञानेश्वर राळे यांचा सन्मान, दुग्धव्यवसायिक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह वितरण, व्यसनमुक्त नागरिकांना बक्षीस तसेच गावासाठी आदर्श काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह देऊन गौरव, आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व सेवकांचा सन्मान, फोर्विया फाउंडेशन, सॉफ्ट बॉक्स सिस्टमस इंडिया, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था या सीएसआर फंड देणाऱ्या कंपन्यांचा ही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबईकर मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी आणि ग्रामपंचायत टेकवडी यांच्या विशेष पुढाकाराने व सहकार्याने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच विठ्ठल शिंदे यांनी केले.