Wed, Feb 8, 2023

भागूजी गोगावले यांची बिनविरोध निवड
भागूजी गोगावले यांची बिनविरोध निवड
Published on : 25 September 2022, 10:38 am
पाईट, ता. २५ ः कोरेगाव बुद्रूक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तात्यासाहेब चंद्रकांत कल्हाटकर तर, व्हाइस चेअरमनपदी संजय भागूजी गोगावले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पार पडली. निवडीच्या वेळी सोसायटीचे संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. बी. मुलाणी व सहायक म्हणून संस्थेचे सचिव बाबाजी वाळूंज यांनी काम पाहिले.