राजगुरूनगरकरांमुळे गरजुंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरूनगरकरांमुळे गरजुंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
राजगुरूनगरकरांमुळे गरजुंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

राजगुरूनगरकरांमुळे गरजुंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

sakal_logo
By

पाईट, ता.२७ : दिवाळीनिमित्त घरातील जुने परंतु वापरण्यायोग्य कपडे तसेच मिठाई देऊन गरजूंची दिवाळी गोड करण्याचा माणुसकी जपण्याचा सामाजिक उपक्रम राजगुरुनगरमधील तरुणांनी राबविला आहे. याचा फायदा आंबोली, टेकवडी (ता. खेड) परिसरातील कातकरी ठाकरवाडीतील तब्बल एक हजार कुटुंबांना झाला. या विधायक उपक्रमामुळे गरजवंतांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
राजगुरुनगरमधील तरुणांनी एकत्र येत वापरण्यायोग्य कपडे देण्याच्या आवाहनास साथ देण्याचे आवाहन केले होते. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला वापरण्यायोग्य कपडे राजगुरुनगर वासियांनी जमा केले. या स्तुत्य उपक्रमास सामाजिक कार्यकर्ते उमेश पडवळ आणि संग्राम सातकरपाटील यांनी उत्तम साथ देत दिवाळी फराळाचे बॉक्स भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.
खेड तालुक्यातील टेकवडी, आंबोली, औदर, आणि कान्हेवाडी येथील कातकरी ठाकरवाडीतील गरजूंना सदर कपडे व दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. गरजूंना कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
राजगुरुनगरकराचे उदात्त मनाचा अनुभव घेत गरजूंची खरी दिवाळी झाली. सदर कामासाठी आंबोलीचे अविनाश शिंदे, संजय घुमटकर, दत्ता रुके, कैलास मुसळे, हेमंत विरकर, रंगनाथ बुट्टे, विठ्ठल शिंदे, जिजाभाऊ मेदगे, मंगेश शेलार, मुकेश तुपे, रेवती तुपे, मालती शेलार, दिलीप राक्षे, सुनील कड यांचे अनमोल सहकार्य लाभले.

01458