
पिंपरी बुद्रूक येथे युद्धकला प्रशिक्षण शिबिर
पाईट, ता. १ : पिंपरी बुद्रूक (ता. खेड) येथील सुमंत विद्यालयाच्या प्रांगणात रणरागीनी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण व संस्कार शिबिर झाले. सदर शिबिर ग्रामपंचायत पिंपरी बुद्रूक व रणरागीनी शिवकालीन युद्धकला व संस्कार प्रशिक्षण संस्था, पुणे आणि पिंपरी बुद्रकच्या श्रमसाफल्य शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरवात मातृ-पितृ व गुरुजन पूजनाने केली.
त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, श्रमसाफल्यचे अध्यक्ष बाबाजी ठाकूर, शिवकालीन संस्थेचे संस्थापक अशोक पवार, मुख्य आयोजक विकास वाळुंज, पिंपरी सरपंच मोनाली ठाकूर, उपसरपंच रोहिदास हुंडारे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा व इतर साहसी खेळ विद्यार्थिनींना शिकविले. विद्यालयातील सहभागी झालेल्या १७७ मुलींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरविंद गवळे यांनी मानले.