''तिरुपती गवळी ग्रामीण बिगरशेती''वर आमदार दिलीप मोहिते यांचे वर्चस्व

''तिरुपती गवळी ग्रामीण बिगरशेती''वर आमदार दिलीप मोहिते यांचे वर्चस्व

पाईट, ता. १ : येथील तिरुपती गवळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेवर आमदार दिलीप मोहिते यांचे वीस वर्षे वर्चस्व कायम राहिले आहे. अशी माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक हिरामण रौधळ व मानद सचिव प्रा.गोपीचंद गायकवाड यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.
संस्थेची २०२३ ते २०२८ अशी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: हिरामण राघू रौधळ, ''शंकर शिवराम ठाकूर, बबन पोपट खेंगले, धोंडिबा श्रीपती शेलार, नंदू भागवत डांगले, अकबर इमाम इनामदार, विजय रघुनाथ करंडे, मारुती नारायण साबळे, दत्तात्रेय विलास जांभळे, पार्वताबाई ठकाजी रौधळ, कविता लक्ष्मण रौधळ यांचा समावेश आहे. सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्योजक हिरामण रौधळ, पंडित रौधळ, मचिंद्र डांगले व इतरांनी विशेष परिश्रम घेतले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक हरिचन्द्र कांबळे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com