
खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी
पाईट, ता. १८ : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील पाईट-अहिरे मार्गे तीर्थक्षेत्र देवतोरणे व आंबेठाण ते बोरदरा या ग्रामीण मार्गातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या मागणीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून या दोन ग्रामीण मार्ग रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.
देवतोरणे हे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असून, भाविकांची येथे वर्षभर सतत वर्दळ असते. पाईट-अहिरे-देवतोरणे या ५ किलोमीटर रस्त्यासाठी १ कोटी २५ रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच, आंबेठाण ते बोरदरा या रस्त्यावर औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. या तीन किलोमीटर रस्त्यासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.