Sat, Sept 30, 2023

रौन्धळवाडीच्या सरपंचपदी भरत रौन्धळ
रौन्धळवाडीच्या सरपंचपदी भरत रौन्धळ
Published on : 3 May 2023, 10:09 am
पाईट, ता. ३ : रौन्धळवाडी (पाईट) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत वनाजी रौन्धळ यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन ग्रामपंचायत रौन्धळवाडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी ग्रामपंचायतचे ७ पैकी ५ सदस्य उपस्थित होते. यापूर्वीचे सरपंच नाना नारायण रौन्धळ यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सदरचे पद रिक्त झाले होते. यामुळे या जागेसाठी रौन्धळ यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे अध्यासी अधिकारी तथा मंडल अधिकारी विजय रंभाजी घुगे यांनी रौन्धळ यांना विजयी जाहीर केले. रौन्धळवाडी ग्रामपंचायतीवर भाजपचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
सहायक म्हणून ग्रामसेविका प्राजक्ता डोके,तलाठी धायगुडे यांनी काम पाहिले.
01667