रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रब्बी हंगामासाठी 
पीक विमा योजना
रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना

रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी केले.

अशी आहे योजना
- प्रधानमंत्री पीक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
- कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे.
- खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
- सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे.
- वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित आहे.

सहभागासाठीची मुदत
- बागायत व जिराईत ज्वारीसाठी ३० नाव्हेंबर २०२२ पर्यंत.
- बागायत गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत.
- उन्हाळी भूईमुग पिकासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत.

असे असेल प्रतिहेक्टरी विमा संरक्षण
- बागायत ज्वारीसाठी ३३ हजार रुपये.
- जिराईत ज्वारीसाठी ३१ हजार रुपये.
- बागायत गहू पिकासाठी ३८ हजार रुपये.
- हरभरा पिकासाठी ३५ हजार रुपये.
- रब्बी कांदा पिकासाठी ८० हजार रुपये.
- उन्हाळी भुईमूग पिकासाठी ४० हजार रुपये.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधा
- विमा कंपनी : आय.सी.आय.सी.आय. जनरल लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे
- टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२
- इ मेल- customersupportba@icicilombard.com
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था, कृषी विभागाचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, नागरिक सुविधा केंद्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय.