
‘लम्पी’बाधीतांना आर्थिक मदत
‘लम्पी’बाधीतांना आर्थिक मदत
पुणे, ता. १६ : लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजारामुळे पुणे जिल्ह्यातील एक हजार २२६ जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ६८२ गाई, १६१ बैल आणि १६३ वासरांचा समावेश आहे.
यापैकी सुमारे ७०० जनावरांच्या मालकांना प्रति जनावर ३० हजार रुपये (मोठे) आणि १६ हजार रुपये (छोटे) याप्रमाणे आर्थिक मदत दिली आहे.
पुणे जिल्ह्यात सुमारे सहा महिन्यांपूर्वी (२६ आॅगस्ट २०२२) लम्पी स्कीन आजाराने बाधित झालेले पहिले जनावर सापडले होते. तेव्हापासून आजतागायतच्या कालावधीत ही जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. आतापर्यंत या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या मार्च अखेरपर्यंत ही आर्थिक मदत वितरित करण्याचे नियोजन राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे. या वृत्ताला जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील जनावरांचे मृत्यू
- एकूण मृत्यू- १२२६
- गाईंची संख्या- ६८२
- बैलांची संख्या- १६३
- वासरांची संख्या- १६१
- अन्य जनावरे संख्या- २२०
आर्थिक मदतीचे स्वरूप
- प्रति जनावर- ३० हजार रुपये (मोठे)
- प्रति जनावर- १६ हजार रुपये (छोठे)
पुणे जिल्ह्यातील जनावरांची संक्षिप्त माहिती
- गाय-म्हैसवर्गीय एकूण जनावरे- ८ लाख २४ हजार
- एकूण जनावरांपैकी बैलांची संख्या- १ लाख २२ हजार
- दुभत्या गाईंची संख्या- ४ लाख ३४ हजार ४००
- एकूण म्हशी- २ लाख ६७ हजार ६००
- दुभत्या म्हशींची संख्या- १ लाख ७५ हजार
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
लम्पी स्कीन या आजारामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ३४१ मृत्यू हे इंदापूर तालुक्यात; तर सर्वांत कमी म्हणजे अवघा १ मृत्यू हा वेल्हे तालुक्यात झाला आहे.
तालुकानिहाय मृत्यूंची संख्या
आंबेगाव- ५८
बारामती- १७१
भोर- १७
दौंड- ७४
हवेली- ६२
इंदापूर- ३४१
जुन्नर- ६२
खेड- ११०
मावळ- ५२
मुळशी- ०८
पुरंदर- ५२
शिरूर- २१८
वेल्हे- ०१