शाश्‍वत संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी वह्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाश्‍वत संस्थेकडून
विद्यार्थ्यांसाठी वह्या
शाश्‍वत संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी वह्या

शाश्‍वत संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी वह्या

sakal_logo
By

फुलवडे, ता. ४ : शाश्वत संस्थेच्या वतीने आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील गरजू ४४३ विद्यार्थ्यांना २६५८ फुलस्केप वह्यांचे वाटप केल्याची माहिती शाश्वत संस्थेच्या विश्वस्त प्रतिभा तांबे यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील आहुपे, बालवीरवाडी, पिंपरगणे, नानवडे, कोंढरे, चिखली, म्हाळुंगे, पाटण, साकेरी, असाणे, माळीण या गावातील आठवी ते दहावीच्या ३१९ आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना १९१४ फुलस्केप वह्यांचे वाटप केले. तसेच, खेड तालुक्यातील टोकावडे, भोरगिरी, वरचे भोमाळे, कारकुडी पाभे, म्हसेवाडी येथील १२४ विद्यार्थ्यांना ७४४ फुलस्केप वह्यांचे वाटप केले.
या उपक्रमासाठी शाश्वत संस्थेचे कार्यकर्ते शांताराम गुंजाळ, देवराम असवले, कृष्णा वडेकर, सुलोचना गवारी, श्‍यामल भोमाळे, प्रशांत वडेकर, सागर तळपे, शंकर लांघी, संजीव असवले, अतुल असवले यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top