
घोडेगाव कोर्टाकडून वन्यप्राण्यांसाठी पाणवठा तयार करण्याची शिक्षा
फुलवडे, ता. २ : घोडेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत दोन वेगवेगळ्या वन गुन्ह्यांमध्ये घोडेगाव कोर्टाने आरोपीस शिक्षा म्हणून दंडात्मक कारवाई बरोबरच सामाजिक भान राखण्यासाठी एक वेगळीच शिक्षा सुनावताना वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने वनक्षेत्रात पाणवठे तयार करण्यास सांगितले आहे.
घोडेगाव वन परिमंडळ हद्दीत वणवा पेटविल्याबद्दल आरोपी दत्तात्रेय कोकणे (कोळवाडी, ता. आंबेगाव) व शिनोली परिमंडळ क्षेत्रात मोराची शिकार केल्याप्रकरणी आरोपी विजय गभाले (रा. गोहे खुर्द, ता. आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून वनकायद्यातील तरतुदीनुसार निर्धारित दंडाची शिक्षा घोडेगाव कोर्टाकडून सुनावण्यात आली. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आरोपींनी वन्यप्राण्यांसाठी स्वखर्चाने वनक्षेत्रात पानवठे तयार करावेत, असा आदेश दिला. या आदेशाची अंमलबजावणी संबंधित आरोपींनी केली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी दिली.
या बाबत वन विभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे, शिनोलीचे वन परिमंडळ अधिकारी जी. डी. इथापे, घोडेगावचे वन परिमंडळ अधिकारी टी. एन. कदम यांनी कार्यवाही केली.
Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00494 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..