
आदिवासींचे राजकीय आरक्षण फिरते नको
फुलवडे, ता. १२ : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर हे तालुके जास्तीत जास्त आदिवासी लोकसंख्या असलेले असूनही पंचायत समिती व जिल्हा परिषदेत सन २०१७ ते २०२२ पंचवार्षिक कालावधीत आदिवासींना आरक्षण ठेवलेले नव्हते. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना राजकीय आरक्षण फिरते ठेवू नये, अशी मागणी आदिवासी समाज कृती समितीचे संस्थापक-संचालक सीताराम जोशी यांनी केली.
त्यांनी सांगितले की, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी उपयोजनेचा हा भाग राष्ट्रपतींनी अनुसूचित क्षेत्र म्हणून अधिसूचना काढून घोषित केले आहे व येथे पेसा कायदा लागू आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आंबेगाव व जुन्नर तालुक्यात प्रत्येक पंचायत समितीत दोन व जिल्हा परिषदेत एक, अशा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात येत होत्या. मात्र, सन २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक कालावधीत फिरत्या आरक्षणामुळे आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी समाजासाठी आरक्षित जागा न ठेवता त्या जागा खेड व मावळला प्रत्येकी दोन व मुळशी येथे एक आरक्षित झाली. त्यामुळे मुळ आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आदिवासींना जिल्हा परिषदस्तरावर प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्याचप्रमाणे पंचायत समितीस्तरावरही अनुसूचित क्षेत्रात जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव न ठेवता त्या पुनर्वसन झालेल्या भागात ठेवल्या. त्यामुळे मुळ आदिवासी भागातून पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही.
Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00496 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..