पिंपरगणे येथील घाटात रिक्षा उलटून तीन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरगणे येथील घाटात 
रिक्षा उलटून तीन जखमी
पिंपरगणे येथील घाटात रिक्षा उलटून तीन जखमी

पिंपरगणे येथील घाटात रिक्षा उलटून तीन जखमी

sakal_logo
By

फुलवडे, ता. १४ : डिंभे-आहुपे रस्त्यावर पिंपरगणे (ता. आंबेगाव) येथील घोडीची धार घाटात शुक्रवारी (ता. १३) रिक्षा उलटली. त्यातील दोघे जण गंभीर व एक किरकोळ जखमी झाले.
मुंबईहून आहुपे येथे लग्नासाठी जात असलेल्यांच्या रिक्षा चालकाला घोडीची धार घाटातील उताराचा अंदाज आला नाही. त्यामुळे अर्जंट ब्रेक लावल्यामुळे रिक्षा त्या ठिकाणी उलटली व रस्त्याच्या खाली असलेल्या उंबराच्या झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघात घडल्याचे समजताच गावातील तरुण मदतीसाठी धावून आले व त्यांनी रिक्षातील प्रवाशांना बाहेर काढले. याच ठिकाणी १५ दिवसांपूर्वी २ वाहने उलटली होती. त्याहीवेळी गावातील तरुणांनी मदत केली. अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी बांधकाम विभागाने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारून पुढील काळात होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी पिंपरगणे येथील सरपंच दुंदा गवारी यांनी केली आहे. याप्रसंगी उपसरपंच भीमा गवारी, शंकर गवारी, किसन पारधी, दीपक सातपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00499 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top