
खरीप हंगामातील पेरण्यांना वेग
फुलवडे, ता. १ ः आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. मात्र भात पिकासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आहुपे, पाटण व भीमाशंकर ही खोरी पावसाचे माहेरघर म्हणून ओळखली जातात. परंतु जून महिना संपला तरी मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
या वर्षी पावसाला उशिरा सुरूवात झाल्याने शेतीच्या मशागतीची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. काही ठिकाणी सोयाबीन पिकांबरोबरच इतर पेरणीची कामे सुरू आहेत. या भागात भात पिकाशिवाय भुईमूग, नाचणी, वरई, सावा, कारळा ही पिके घेतली जातात. भात रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत, मात्र दमदार पाऊस न पडल्याने भात खाचरे पाण्याने न भरल्याने यावर्षी भात लागवड उशिरा होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
PHE22A01328
Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00558 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..