
फुलवडे परिसरामध्ये भात रोपे, बांधांचे नुकसान
फुलवडे, ता. २० : फुलवडे (ता. आंबेगाव) परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी शेतात शिरले. तरारलेल्या भात रोपांत घुसल्याने ती गाडली तर बांध फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले.
शेतीचे बांध फुटल्याने किसन नंदकर, गंगाराम नंदकर, गंगुबाई घोटकर, किशोर तळपे तसेच अन्य शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटून वाहून गेले. तसेच शेतातील रोपे गाडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फुलवडे ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ जंगले यांनी केली आहे.
दरम्यान, पाण्याने शेतात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांनी भात लागवड केली तर काही शेतकऱ्यांची रोपे लागवडीसाठी तयार झालेली होती. त्यामध्ये पावसाचे पाणी घुसून मुसळधार पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. सुमारे ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
01390
Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00581 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..