डिंभे धरणात ११ टीएमसी साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरणात ११ टीएमसी साठा
डिंभे धरणात ११ टीएमसी साठा

डिंभे धरणात ११ टीएमसी साठा

sakal_logo
By

फुलवडे, ता. ३१ ः कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे व महत्त्वाचे समजले जाणारे डिंभे धरण (ता. आंबेगाव) आज ८०. ९४ टक्के म्हणजेच १०. ११३ टीएमसी भरले असून धरण क्षेत्रात आज अखेर ७४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा ४. ६८ टक्के इतकाच होता. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसाने महिन्याभरात पाणीसाठ्यात ७५ टक्के वाढ झाली आहे.
या धरणाच्या पाण्यामुळे पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी मिळत असून आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शेतकऱ्यांना डिंभे धरणातील पाण्याचा लाभ मिळतो.

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00591 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top