‘जागतिक आदिवासी दिनी सुट्टी जाहीर करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जागतिक आदिवासी दिनी सुट्टी जाहीर करा’
‘जागतिक आदिवासी दिनी सुट्टी जाहीर करा’

‘जागतिक आदिवासी दिनी सुट्टी जाहीर करा’

sakal_logo
By

फुलवडे, ता. २ ः आपल्या महाराष्ट्रातील लोकसंख्येपैकी १० टक्के लोकसंख्या ही आदिवासींची आहे. राज्यातच नव्हे तर देशभरात ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे आपण जागतिक आदिवासी दिनी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या मागणीचे निवेदन जांभोरी (ता. आंबेगाव) ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचे सांगितले आहे. नुकतीच त्यांनी दहीहंडीच्या दिवशी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे आदिवासी जनतेचा विचार करून ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनी शासकीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनात केली असल्याचे पारधी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00599 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top