डिंभे धरण ९५ टक्के भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरण ९५ टक्के भरले
डिंभे धरण ९५ टक्के भरले

डिंभे धरण ९५ टक्के भरले

sakal_logo
By

फुलवडे, ता. १३ : हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरण (ता. आंबेगाव) हे धरण ९५ टक्के भरले आहे. धरण आजपर्यंत एकूण ८९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे वाढते प्रमाण वाढल्याने ४५०० क्लुसेकने पाणी घोडनदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोडनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
श्रावण महिन्यात पावसामुळे हिरवेगार नटलेले डोंगर, ठिकठिकाणी डोंगरातून वाहणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद रिमझिम पावसात भिजत पर्यटक घेताना दिसत आहेत. सलगच्या सुट्यांमुळे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे.

धरणाचे पाणी सोडतानाचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी येत आहेत. अनेक पर्यटक सेल्फी काढण्यासाठी पुलाच्या रेलींगला उभे राहून फोटो काढत आहेत. तर काही पर्यटक पुलावरील रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून फोटो काढत पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत.

निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी
डिंभे परिसरातील गोहे तलाव, पोखरी घाट, कोंढवळ धबधबा, आहुपे, भीमाशंकर मंदिर, नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईंट तसेच भीमाशंकर अभयारण्य आदी निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच पर्यटकांसाठी याठिकाणांवर चहाची टपरी, मका कणीस, उकडलेल्या व भाजलेल्या शेंगा, वडापाव, भजी या प्रकारची दुकाने छोट्यामोठ्या व्यवसायिकांनी थाटली आहेत.

01470

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00615 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..