बोरघर फाटा येथे अनियमित वीज पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरघर फाटा येथे अनियमित वीज पुरवठा
बोरघर फाटा येथे अनियमित वीज पुरवठा

बोरघर फाटा येथे अनियमित वीज पुरवठा

sakal_logo
By

फुलवडे, ता. १९ : बोरघर फाटा (ता. आंबेगाव) येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून विद्युत पुरवठा अनियमितपणे होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. महावितरणने त्वरित विद्युत रोहित्र दुरुस्त करून ते अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी दूध डेअरीचे अध्यक्ष बुधाजी डामसे व ग्रामस्थांनी केली आहे.
याठिकाणी मोठी दूध डेअरी असून दिवसाला १३५ शेतकऱ्यांचे सुमारे ११०० लिटर दूध याठिकाणी संकलित होत असते. हे दूध थंड करून इतर डेअरीकडे पाठविले जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून विद्युत पुरवठा अनियमितपणे होत असल्याने शेतकऱ्यांचे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंतचे दूध खराब होत आहे. त्यामुळे महावितरणने तत्काळ या विद्युत रोहित्राची दुरुस्ती करून ते अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी केल्याचे डामसे व ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Phe22a00657 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..