''शाश्र्वत''च्या अभ्यास वर्गात ३६० विद्यार्थ्यांना धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शाश्र्वत''च्या अभ्यास वर्गात ३६० विद्यार्थ्यांना धडे
''शाश्र्वत''च्या अभ्यास वर्गात ३६० विद्यार्थ्यांना धडे

''शाश्र्वत''च्या अभ्यास वर्गात ३६० विद्यार्थ्यांना धडे

sakal_logo
By

फुलवडे, ता. १८ : मंचर (ता. आंबेगाव) येथील शाश्वत संस्थेतर्फे दोन वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील दुर्गम वाड्यावस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग सुरू असून पहिली ते सहावीतील एकूण ३६० विद्यार्थी या शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

आहुपे, बालवीरवाडी, जळकेवाडी, गेटाचीवाडी, पिंपरगणे, नानवडे, कोंढरे, शिंदेवाडी, निगडाळे, म्हतारबाची वाडी, फलोदे, पिंपरी, नांदुरकीची वाडी, इष्टेवाडी, बांबळेवाडी, चिखली व खेड तालुक्यातील येळवली, भोरगिरी, टोकावडे, पाभे, कारकुडी, वांजाळे, आढळवाडी, सरेवाडी, म्हसेवस्ती या अभ्यासवर्गासाठी २६ स्वयंसेवक, २ पर्यवेक्षक, १ प्रकल्प व्यवस्थापक कार्यरत असून त्यांना दोन वर्षापासून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. अभ्यास वर्गांमध्ये मुलांना वाचन, लेखन, गणितीय क्रियांचा पाया पक्का करून घेण्याबरोबरच विविध पूरक उपक्रमही राबविले जात आहेत.
संस्थेतर्फे डॉ. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्याप्रमाणे १३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या तीन दिवसात अभ्यासवर्गांमध्ये पोस्टर लेखन करणे, पुस्तक प्रदर्शन, कोपरा सजावट, चित्रकला स्पर्धा, तरंग पुस्तके, प्रकट वाचन, आपसात वाचन स्पर्धा, ग्रंथ दिंडी, वृक्ष दिंडी आदी उपक्रम राबवून ध्येय नेहमी मोठे ठेवा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान, जिथे पुस्तक साठा तिथे नाही समृद्धीला तोटा असे बोर्ड हातात धरून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
कार्यक्रमांचे नियोजन विश्वस्त प्रतिभा तांबे, प्रकल्प समन्वयक अरुण पारधी, सुपरवायझर श्यामल गोपाळे यांनी केले.

01665