''डिंभे''चे पाणलोट क्षेत्र पाटण खोऱ्यासाठी वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''डिंभे''चे पाणलोट क्षेत्र पाटण खोऱ्यासाठी वरदान
''डिंभे''चे पाणलोट क्षेत्र पाटण खोऱ्यासाठी वरदान

''डिंभे''चे पाणलोट क्षेत्र पाटण खोऱ्यासाठी वरदान

sakal_logo
By

फुलवडे, ता. ३१ : यंदा दमदार परतीच्या पावसामुळे डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे हे पाणलोट क्षेत्र पाटण खोऱ्यातील (ता. आंबेगाव) सावरली, साकेरी, पिंपरी, पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खुर्द, कुशीरे बुद्रुक, नानवडे, दिगद, मेघोली, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सध्या उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यातील शेतीच्या प्रश्‍न मिटला आहे.

पाटण खोऱ्यात पाणलोट क्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे छोटे-छोटे बंधारे असून डोंगर माथ्यावरून येणारे पाणी त्या अडविले जाते. त्यातून उपसा सिंचनाद्वारे आदिवासी शेतकरी बागायती शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो.

खोऱ्यात चार महिने जोरदार पाऊस पडत असल्याने चार महिने सूर्याचे व चंद्राचे दर्शन देखील लवकर होत नाही. त्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात भरत असतो. प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान हे भात शेतीवर अवलंबून असते. भात हेच एकमेव व मुख्य पीक असल्याने भात शेतीच आदिवासी शेतकऱ्यांचा जीवनाचा मुख्य आधार समजला जातो.

उन्हाळ्यातील चार महिने या आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी दऱ्याखोऱ्यातील टाक्यांमधून अथवा पाणलोट क्षेत्रातील गाळमिश्रित पाणी वापरावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. येथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी पाटण खोऱ्यात उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे.
- पुनाजी पारधी, अध्यक्ष : जांभोरी ग्रामविकास फाउंडेशन, जांभोरी (ता. आंबेगाव)

डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्र सध्या आदिवासींसाठी वरदान ठरत आहे.धरणामुळे अंशतः विस्थापित झालेल्या आदिवासी शेतकऱ्यांना आदिवासी विभागा मार्फत १०-१० शेतकरी मिळून सिंचन योजना मंजूर केल्यास ५०० शेतकऱ्यांची जमीन ओलीताखाली येईल.
-बुधाजी डामसे, सामाजिक कार्यकर्ते
01723