औदुंबरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष जंगले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औदुंबरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष जंगले
औदुंबरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष जंगले

औदुंबरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष जंगले

sakal_logo
By

फुलवडे, ता. १६ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील औदुंबरेश्वर आदिवासी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सन २०२२ ते २०२७ या कालावधीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. सलग पाचव्यांदा अध्यक्षपदी सुभाष जंगले यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी सखाराम भारमळ, संचालकपदी बबन मोहरे, एकनाथ डामसे, सोमा मोहरे, राजकुमार लोहकरे, विठ्ठल हिले, राजेंद्र बोऱ्हाडे, आशालता उघडे, मोहिनी भारमळ यांची निवड झाली. तर तज्ज्ञ संचालकपदी चिंतामण भारमळ, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप भारमळ, लेखनिक शरद मोहरे यांची नेमणूक झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. बगाटे यांनी काम पाहिले.