वैयक्तिक शेततळी अनुदान रकमेत वाढ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैयक्तिक शेततळी अनुदान रकमेत वाढ 
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
वैयक्तिक शेततळी अनुदान रकमेत वाढ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

वैयक्तिक शेततळी अनुदान रकमेत वाढ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

sakal_logo
By

फुलवडे, ता. ११ ः कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वी मिळणाऱ्या पन्नास हजार ऐवजी पंच्याहत्तर हजार रक्कम आता केल्याने शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार आहे. या योजनेसाठी तालुकानिहाय उद्दिष्ट दिले असून आंबेगाव तालुक्याकरिता ४७ एवढे शेततळे मंजूर करण्यात येणार आहेत. ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थींची निवड करून योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीस अनुज्ञेय असलेले अनुदान आधार लिंक बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तरी, या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी केले.

असा करावा अर्ज
महा-डीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. या करिता ‘सिंचन साधने व सुविधा’ या टाईल अंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ निवडावे, यानंतर ‘इनलेट व आउटलेट सह’ अथवा ‘इनलेट व आउटलेट विरहित’ यापैकी एक उपघटक निवडावा. त्यानंतर शेततळे आकारमान व स्लोप निवडावा. याप्रमाणे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सदर लाभार्थी शेतकरी महा-डीबीटी पोर्टलवर सोडतीद्वारे निवडीची कार्यवाही करण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष
महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतः च्या नावे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र व शेततळे खोदण्यासाठी जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याने याअगोदर मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे अथवा अन्य कोणत्याही योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.