
फुलवडेत जागतिक दिव्यांग सप्ताह
फुलवडे, ता. १३ ः दिव्यांग विद्यार्थी परिपूर्ण असून त्यांच्या आवश्यक गरजांची पूर्तता होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केल्यास सर्वसामान्य मुलांप्रमाणे तेही प्रगती करतील. दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवणे हे पालकांपुढील आव्हान असून त्यांच्या गरजा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी यांनी केले.
त्या तळेघर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग सप्ताहनिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, प्रमाणपत्र वाटप शिबिरात बोलत होत्या. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, समावेशित शिक्षण पंचायत समिती, आंबेगाव आणि सत्कर्म फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने शिबिराचे आयोजन केले होते. या प्रसंगी मनोदय योगोपचार केंद्र मंचरचे योगथेरपीस्ट डॉ. शशिकांत हुले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या व त्यावर पालकांनी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच चंद्रकांत उगले होते. या वेळी सत्कर्म फाउंडेशनचे संचालक अनुज नरुला, दत्तात्रय सावंत, माजी उपसभापती सलीम तांबोळी, सरपंच कविता इष्टे, शिक्षणविस्तार अधिकारी साहेबराव शिंदे, केंद्रप्रमुख चिमा बेंढारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अमर माळी, छाया केदारी, राजेश मंदावार, विशेष शिक्षिका प्रतिभा पडवळ, सैफ सय्यद, आदर्श शिक्षक चांगदेव पडवळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण इष्टे, तारामती भागित, मारुती इष्टे, हनुमंत इष्टे, तुळशीराम इष्टे, शांताराम मोहंडूळे, दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित होते. संयोजन मुख्याध्यापक सावळेराम आढारी, उषा गवारी, संतोष थोरात, मनोहर केंगले, किरणराज शेंगाळे, मनोहर थोरात, बाळासाहेब गेंगजे, तुकाराम डामसे, वामन गभाले, नयना चौधरी, गोविंद उतळे, काळूराम भांगरे यांनी केले.
Associated Media Ids PHE22A01830, PHE22A01831