
जांभोरी येथे निबंध, चित्रकला, रांगोळी स्पर्धा
फुलवडे, ता. २८ ः जांभोरी (ता. आंबेगाव) येथील ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध शालेय स्पर्धांचे आयोजन केले होते, अशी माहिती जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी यांनी दिली.
निबंध, चित्रकला, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोरी, काळवाडी, माचीचीवाडी, नांदूरकीची वाडी, हरणमाळ व न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेत ३ गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, जांभोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मारुती पारधी, बाळू मडके, संजय केंगले, विजय डोके, संतोष पोखरकर, संजयकुमार पडवळ यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :- निबंध स्पर्धा - गट क्रमांक १ - अस्मिता केंगले, ओमकार केंगले, शुभम केंगले, गट क्रमांक २- निशा भोकटे, सिद्धी केंगले, आर्यन केंगले, गट क्रमांक ३ - तनया मेचकर, आरती ढेंगळे, प्रतीक्षा तिटकारे.
चित्रकला स्पर्धा - गट क्रमांक १ - शुभम भवारी, रोशन साळवे, मोहिनी केंगले, गट क्रमांक २-प्रिया केंगले, प्रिया आंबेकर, श्रावणी केंगले, गट क्रमांक ३ - वैष्णवी हिले, साक्षी केंगले, अक्षदा डवणे.
रांगोळी स्पर्धा - गट क्रमांक १ - स्वरा पारधी, आराध्या केंगले, आश्लेषा डवणे, गट क्रमांक २- अर्चना डवणे, गौरी बांबळे, अक्षदा बांबळे, गट क्रमांक ३ -प्रतीक्षा तिटकारे, सानिका उंडे, आरती ढेंगळे.
वक्तृत्व स्पर्धा- गट क्रमांक १ - सुमीत पारधी, गौरी मेचकर, विनायक पारधी, गट क्रमांक २ - पृथ्वी गिरंगे, आर्यन केंगले, श्रावणी केंगले, गट क्रमांक ३ - शिवानी गिरंगे, रोहन केंगले, अक्षय केंगले.