आंबे येथे ९६ महिलांना हिरडा ग्रेडिंगचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबे येथे ९६ महिलांना हिरडा ग्रेडिंगचे प्रशिक्षण
आंबे येथे ९६ महिलांना हिरडा ग्रेडिंगचे प्रशिक्षण

आंबे येथे ९६ महिलांना हिरडा ग्रेडिंगचे प्रशिक्षण

sakal_logo
By

फुलवडे, ता. १८ : आंबे (ता. जुन्नर) येथे आदिवासी भागातील १० महिला बचत गटातील ९६ महिलांना हिरडा ग्रेडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. गाडेवाडी (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर मत्स्य, कृषी व वनोउपोज प्रोड्युसर कंपनी व शाश्वत संस्थेच्या माध्यमातून तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे, अशी माहिती भीमाशंकर कंपनीचे अध्यक्ष बुधाजी डामसे व सचिव दुंदा जढर यांनी दिली.
हिरडा हे आदिवासींचे एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. शासनाने हा हिरडा खरेदी करण्याचे थांबविल्याने या शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनीने शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांच्याकडे मार्गदर्शन मागितले. त्यानुसार त्यांनी भीमाशंकर प्रोड्युसर कंपनीला त्यांनी अर्थसहाय्य केले.
पुणे व आंबे येथे आंबेगाव तालुक्यातील राजपूर, तेरुंगण, जांभोरी, काळवाडी, भोईरवाडी, कोंढरे व जुन्नर तालुक्यातील आंबे, दुर्गावाडी, चावंड, तळेरान, घाटघर या गावातील महिलांना सुजित कुंजीर यांनी यंत्र वापराबाबत प्रशिक्षण दिले. त्याचप्रमाणे उमा मते, पुष्पा नाडेकर यांनी महिलांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेच्या सरपंच मंगल चिमटे या होत्या. कार्यक्रमाचे नियोजन कविता चिमटे, कलाबाई हेमाडे, पुष्पा शेळके, आशा डावखर, मंदा भोकटे, अनिता असवले यांनी केले. आशा डावखर यांनी आभार मानले.

01972