बाजरीच्या पेरणीत शेतकरी फुलवडे भागामध्ये व्यस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजरीच्या पेरणीत शेतकरी फुलवडे भागामध्ये व्यस्त
बाजरीच्या पेरणीत शेतकरी फुलवडे भागामध्ये व्यस्त

बाजरीच्या पेरणीत शेतकरी फुलवडे भागामध्ये व्यस्त

sakal_logo
By

फुलवडे ता. २४ : फुलवडे तसेच बोरघर (ता. आंबेगाव) परिसरात बाजरी पिकाच्या पेरणीमध्ये शेतकरी व्यस्त आहेत. हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरण (ता. आंबेगाव) पाणलोट क्षेत्र हळूहळू कमी होत असल्याने पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गाळपेर लागवडींना सुरुवात केली.
डिंभे धरण जलाशयातून होणाऱ्या विसर्गावर आदिवासी भागातील फुलवडे, बोरघर, पंचाळे, अडिवरे, कुशिरे, म्हाळुंगे, पाटण येथील शेतकऱ्यांचे बाजरीचे उत्पादन अवलंबून असते. पाणी टप्याटप्याने सोडल्यास आदिवासी भागात बाजरी उत्पादन चांगले येऊ शकते. असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बाजरी फुलोऱ्यात मधमाश्यांना पूरक खाद्यव्यवस्था तयार होते. त्यामुळे मध उत्पादन व मधमाश्यांचे नैसर्गिक संगोपन होते. त्याचप्रमाणे पर्यायी चारा उपलब्धता दुग्ध व्यवसायाकरिता पोषक आहे.

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पिकाचे क्षेत्र सर्वसाधारण ४०० हेक्टर असून बाजरी पिकाकरिता हवामान उष्ण व कोरडे आवश्यक असते. बाजरी पिकाच्या लागवडीकरिता एकरी ४ किलो बाजरी बियाणे वापरून पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केली असता उगवण चांगली होते, असे आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी सांगितले.

01984