आंबेगावच्या आदिवासी भागात स्वच्छता किट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावच्या आदिवासी 
भागात स्वच्छता किट वाटप
आंबेगावच्या आदिवासी भागात स्वच्छता किट वाटप

आंबेगावच्या आदिवासी भागात स्वच्छता किट वाटप

sakal_logo
By

फुलवडे, ता. ३ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील हरणमाळ, इष्टेवाडी, म्हतारबाचीवाडी, भागीतवाडी, कुशिरे, पाटण, कोलतावडे आदी १० जिल्हा परिषद शाळांना सोशल हेल्प अँन्ड हेल्थ फाउंडेशन टाकेवाडी व साई प्रतिष्ठान चांडोली बुद्रूक यांच्यावतीने स्वच्छता साहित्य किटचे वाटप केले. किटमध्ये शालेय स्वच्छतेसंदर्भातील भिंतीवरील आरसा, नेलकटर, खराटा, झाडू, सुपली, स्वच्छता नॉब, कंगवा, फिनेल बॉटल आदी वस्तूंचा समावेश आहे.

याप्रसंगी सोशल हेल्प अँन्ड हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश चिखले, साई प्रतिष्ठान चांडोलीचे अध्यक्ष ऋषिकेश थोरात, सदस्य तनुजा पोखरकर, प्रवीण शिंदे, मयांक सांडभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयराव आढारी आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम राबविल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य विजयराव आढारी यांनी दोन्ही संस्थेचे सामाजिक कार्य तसेच शैक्षाणिक योगदान खुपच मोलाचे आहे असे सांगून सर्वांचे आभार मानले.