आंबेगावात महिलांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात महिलांसाठी 
मोफत मोतीबिंदू तपासणी
आंबेगावात महिलांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी

आंबेगावात महिलांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी

sakal_logo
By

फुलवडे, ता. ४ ः निगडाळे (म्हतारबाचीवाडी ता. आंबेगाव) येथील सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सर्व महिलांसाठी खुले व मोफत असून मोतीबिंदू तपासणी ६ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे तर शस्त्रक्रिया मंचर उपजिल्हा रुग्णालयात ८ मार्च रोजी होणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गम आदिवासी भागातील महिलांसाठी प्रथमच उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांची मिरवणूक, विविध कार्यक्रम, महिलांचा गौरव तसेच खास महिलांसाठी तपासणी आरोग्य शिबिरांचेही आयोजन पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८ मार्च रोजी करण्यात आले आहे. शिबिरासाठी ८६६९४२००४५ किंवा ९१३७२०८६८० या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन कंपनीचे संचालक सीताराम जोशी यांनी केले आहे.