विद्यार्थांना भविष्यासाठी सज्ज करणे आवश्यक

विद्यार्थांना भविष्यासाठी सज्ज करणे आवश्यक

फुलवडे, ता. ११, "आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता कक्ष घोडेगाव अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून विद्यार्थांना भविष्यासाठी सज्ज करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी केले.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत ता. ९ व १० मार्च रोजी आयोजित केलेल्या दुसऱ्या केंद्रस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विठ्ठल चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक योगेश खंडारे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुरगुडे व बाळासाहेब शिंदे, प्राचार्य चंद्रकांत नाईकडे, एलएफईचे गौरव पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा गोहे, राजपूर, तेरुंगण, आहुपे, असाणे, सोमतवाडी, अंजनावळे, सोनावळे, खटकाळे, आंबे, खिरेश्वर, मुथाळणे, इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव तसेच अनुदानित आश्रमशाळा फुलवडे, चावंड, तळेरान, आलमे, कोळवाडी, ओतूर मधील इयत्ता १ ते ७ वर्गाला अध्यापन करणारे प्राथमिक मुख्याध्यापक, पदवीधर व प्राथमिक शिक्षक सहभागी झाले होते.
प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक भागवत भंगे, सिद्धेश्वर हत्तरगे यांनी कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी जीमेल खाते तयार करणे, शैक्षणिक उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे जतन करणे व लिंकद्वारे पाठवणे यासाठी गुगल ड्राईव्हचा वापर करणे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

02041

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com