आधुनिक शेळीपालनाबाबत तळेघर येथे उद्या प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक शेळीपालनाबाबत तळेघर येथे उद्या प्रशिक्षण
आधुनिक शेळीपालनाबाबत तळेघर येथे उद्या प्रशिक्षण

आधुनिक शेळीपालनाबाबत तळेघर येथे उद्या प्रशिक्षण

sakal_logo
By

फुलवडे, ता. १३ : तळेघर (ता. आंबेगाव) येथे येथे गुरुवारी (ता. १६) ''आदिवासी भागात आधुनिक शेळीपालन'' या विषयावर आदिवासी भागातील पशुपालक, बचत गटातील महिला व पुरुष यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थान व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रात मांसासाठीच शेळीपालन केले जाते. परंतु अजूनही कोणी याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहात नाही. ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक स्थिती बदलण्याची क्षमता शेळीपालन व्यवसायात आहे. याविषयी सखोल घटकांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आधुनिक शेळीपालनाचे फायदे - म्हैस, गाय व इतर पशुपालनाच्या तुलनेत शेळीपालनाला कमी जागा लागते. शेळीपालनाला इतर प्राण्यांच्या तुलनेत फार कमी अन्न लागते. शेळीपालनाच्या फायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ. युवराज रघतवान, डॉ. सुरेश कड, डॉ. नम्रता आंबेकर, डॉ. रूपेश खामकर, डॉ. मधुकर सुरकुले मार्गदर्शन करणार असून आदिवासी भागातील पशुपालकांनी या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रशांत साळवे यांनी केले आहे.