अनुसूचित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचासाठी कार्यशाळा

अनुसूचित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचासाठी कार्यशाळा

फुलवडे, ता. १८ : पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ महाविद्यालयात आदिवासी समाज कृती समितीच्यावतीने रविवारी (ता. १९) अनुसूचित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे, पिंपरगणे, तिरपाड, असाणे, माळीण, पंचाळे, कोंढवळ, राजपूर, तळेघर, जांभोरी, चिखली, जांभोरी, राजेवाडी, गोहे खुर्द, डिंभे खुर्द, ढाकाळे, शिनोली, गंगापूर, कोलतावडे आदी गावांमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची कार्यशाळा तसेच आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
अनुसूचित क्षेत्रात पेसा व वनहक्क कायदा याचे महत्त्व लक्षात घेऊन पेसा कायदा या विषयावर आदिवासी समाज कृती समितीचे संस्थापक, संचालक सीताराम जोशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावचे कार्यालयीन अधीक्षक योगेश खंडारे हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष नामदेव गंभिरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com