आंबेगावच्या पश्‍चिम भागात पंचनामे करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावच्या पश्‍चिम भागात
पंचनामे करण्याची मागणी
आंबेगावच्या पश्‍चिम भागात पंचनामे करण्याची मागणी

आंबेगावच्या पश्‍चिम भागात पंचनामे करण्याची मागणी

sakal_logo
By

फुलवडे, ता. २० : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे, भीमाशंकर, पाटण खोऱ्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी यांनी केली.
निगडाळे, जांभोरी, तळेघर, फलोदे, चिखली, पोखरी, आहुपे, तिरपाड, असाणे आदी गावांमध्ये गेली दोन-तीन दिवस विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसाने व गारपिटीमुळे जनावरांची वैरण, भाताचा पेंढा भिजून गेला. सध्या भात शेतीसाठी मशागतीची कामे सुरू असल्याने शेत भाजणीसाठी जमविलेला पालापाचोळा, गोवऱ्या, राब भिजून गेला आहे. तर, हिरड्याच्या झाडांचा मोहोरदेखील पडला आहे.
फलोदे येथील सीताराम तुकाराम मुदगुण यांची जनावरे रानात चरत असताना विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. त्यावेळी एका बैलाचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू झाला. प्रशासनाने या भागातील पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.