अनुसूचित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचांची कार्यशाळा

अनुसूचित क्षेत्रातील सरपंच, उपसरपंचांची कार्यशाळा

फुलवडे, ता. २१ : पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने रविवारी (ता. १९) रोजी अनुसूचित क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांची कार्यशाळा झाली.
कार्यशाळेत पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त उपकुलसचिव सीताराम जोशी यांनी पेसा कायद्यात दिलेले विषय जल, जंगल, जमीन, गौण खनिज, गौण वनउपज, मादक द्रव नियंत्रण, बाजाराचे व्यवस्थापन, सावकारी नियंत्रण व ग्रामसभेला दिलेले विशेष अधिकार यावर मार्गदर्शन करून आदिवासींच्या जीवनात या कायद्याचे किती महत्त्व आहे हे पटवून दिले. प्रशिक्षणात उपस्थित सरपंचांपैकी सोमा दाते, खेमा गभाले, शीला लोहकरे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गंभीरे होते. कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे महानगर पालिका सेवेत पदोन्नती मिळालेले पदाधिकारी गिरीश भांगरे, प्रसाद भांगे, काशिनाथ गांगुर्डे यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लक्ष्मण भालेकर, सतीश लेंभे, सुदाम चपटे, पेसा कायद्याचे अभ्यासक ॲड किरण गभाले, अशोक गभाले, नीलेश साबळे, बाळासाहेब डोळस उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. शशिकांत साळवे यांनी केले. सूत्रसंचालन किसन भोजने यांनी तर आभार खेवजी भोईर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com