सरळसेवा भरती तयारीसाठी
असाणे येथे सराव परीक्षा

सरळसेवा भरती तयारीसाठी असाणे येथे सराव परीक्षा

फुलवडे, ता. २३ : असाणे (ता. आंबेगाव) येथील आदिवासी क्रांती संघटनेच्या वतीने काळभैरवनाथ यात्रा
उत्सवाचे औचित्य साधून आगामी सरळसेवा भरतीच्या धर्तीवर दुसऱ्यांदा सराव लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी आयोजित केली आहे.
आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी. शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, प्रयोगशाळा परिचर, पुरवठा निरीक्षक, भांडारपाल पदासाठीच्या सरळसेवा परीक्षांचा सराव व्हावा, या उद्देशाने या सराव परीक्षेचे आयोजन केल्याचे आदिवासी क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर ठुबल यांनी सांगितले.
सराव परीक्षेत अंकगणित, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, मराठी व इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, राज्यशास्त्र, विज्ञान संगणक व पंचायत राज या घटकांवर आधारित प्रश्न असतील. परीक्षेसाठी आठवी ते पदवीधर, अशी पात्रता असेल. सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीमधून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येणार असून, त्यांना रोख रक्कम, पुस्तके, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
सराव परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. परीक्षेचा निकाल व बक्षीस वाटप ४ एप्रिल रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी सागर ठुबल (८०० ७५१ ७४३८), पेवजी मोहरे (९६७ ३७५ १३०९), रामदास ढवळे (७३७ ८६३ ५६११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com