वीज पुरवठा खंडित झाल्याने जांभोरीतील नागरिकांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज पुरवठा खंडित झाल्याने 
जांभोरीतील नागरिकांचे हाल
वीज पुरवठा खंडित झाल्याने जांभोरीतील नागरिकांचे हाल

वीज पुरवठा खंडित झाल्याने जांभोरीतील नागरिकांचे हाल

sakal_logo
By

फुलवडे, ता. २२ : जांभोरी (ता. आंबेगाव) येथील नांदुकीचीवाडी, माळवाडी, लोहारवाडी, जांभोरी गावठाण येथील वीजपुरवठा गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसामुळे खंडित झाला आहे. त्यामुळे या वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरण विभागाने संबंधित वाड्यावस्त्यांवरील वीजपुरवठा पूर्ववतपणे सुरू करावा, अशी मागणी बिरसा ब्रिगेड जांभोरीचे अध्यक्ष सुनील गिरंगे यांनी केली आहे.
जांभोरी येथे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या आहेत, तर काही ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ मारुती केंगले, अरुण केंगले, केशव केंगले, बबन केंगले, नितीन गिरंगे, भीमा केंगले, रामचंद्र भवारी, शांताराम केंगले यांनी केली आहे.
त्याचप्रमाणे आदिवासी भागातील आठ गावे व वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पोखरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित केल्याने जांभोरी, चिखली, पोखरी, राजेवाडी, मापोली, गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, कोलतावडे ही गावे व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.