जांभोरीत महिला मेळाव्यास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभोरीत महिला मेळाव्यास प्रतिसाद
जांभोरीत महिला मेळाव्यास प्रतिसाद

जांभोरीत महिला मेळाव्यास प्रतिसाद

sakal_logo
By

फुलवडे, ता. २५ : जांभोरी (ता. आंबेगाव) येथे शाश्वत ट्रस्ट जुन्नर यांच्या वतीने मंगळवार (ता. २१) रोजी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये जांभोरी, तेरुंगण, राजपूर, तळेघर, कोंढरे, भोईरवाडी येथील ३१० महिला सहभागी झाल्याची माहिती शाश्वत ट्रस्टचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जांभोरीच्या सरपंच सुनंदा पारधी तर प्रमुख पाहुण्या संगीता तळपे होत्या. जांभोरीचे माजी सरपंच संजय केंगले, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मनीषा जारकर, अडिवरेच्या सरपंच संगीता किर्वे, श्यामराव बांबळे याप्रसंगी उपस्थित होते.
‘‘आदिवासी महिलांनी कुटुंबाची जबाबदारी पार पाडत व्यवसाय केला पाहिजे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आले पाहिजे.’’ असे मत याप्रसंगी पारधी यांनी व्यक्त केले. उमा मते यांनी क्रांतिकारक होन्या केंगले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. आदिवासी बंडकाऱ्यांनी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी इंग्रज व सावकारांशी कसा लढा दिला याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी संगीत खुर्ची, फुगडी, चमचा लिंबू, बंडकरी गीत, उखाणे, लेझीम आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्यांना डब्बे, बाउल, फोटोफ्रेम आदी बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन पुष्पा शेळके, अनिता असवले, पुष्पा नाडेकर, उमा मते, सुनंदा डामसे, नारायण भोकटे, विकास पोटे, कैलास डावखर, सुभाष भोकटे यांनी केले. सूत्रसंचालन आशा डावखर, मंदा भोकटे यांनी केले.