तळेघर आरोग्य केंद्रातर्फे वाड्यावस्त्यांवर सुविधा

तळेघर आरोग्य केंद्रातर्फे वाड्यावस्त्यांवर सुविधा

फुलवडे, ता. २३ : मंचर - भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर प्राथमिक आरोग्य केंद्र हे या भागातील महत्त्वाचे आरोग्य केंद्र समजले जाते. या आरोग्य केंद्रांतर्गत पोखरी, जांभोरी, कुशिरे, तेरुंगण, पाटण या उपकेंद्रांद्वारे आदिवासी भागातील गावे व वाड्यावस्त्यांवर आरोग्य सुविधा पुरविण्यात येते.
सर्व विभागाची स्वच्छता करून आवारातील दर्शनीभाग सुशोभीकरण करून आरोग्य विषयक वेगवेगळ्या योजनांचे फलक अद्ययावत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी चेतन पाटील यांनी दिली. तसेच २ गट प्रवर्तक व २२ आशासेविका घरोघरी जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करत आहेत.

दरम्यान, आरोग्य केंद्रात पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, रुग्णांची योग्यप्रकारे व्यवस्था करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

माझ्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याने मुलीला उपचारासाठी तळेघर आरोग्य केंद्रात घेऊन आलो असता त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. फक्त एक आरोग्य सेविका उपस्थित होती. त्यांनी डॉक्टरांना फोन केल्यानंतर डॉक्टर उपलब्ध झाले. त्यानंतरही वनविभागाचे अधिकारी आल्यानंतरच डॉक्टरांनी उपचार केले.
- बाळू मेमाणे, फलोदे, ता. आंबेगाव.

आरोग्य केंद्रात दिवस-रात्र डॉक्टर उपस्थित असतात. आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णाला वेळेवर व योग्यप्रकारे उपचार मिळाले पाहिजेत व
विविध साथीच्या रोगांवर योग्य नियोजन करावे. याबाबत डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत.
- कविता इष्टे, सरपंच, तळेघर ता. आंबेगाव

आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सुविधा
* आरोग्य केंद्रामध्ये नॉर्मल प्रसूती
* रक्तदाब, मधुमेह तपासणी,
* दर गुरुवारी गरोदर मातांसाठी ममता दिन,
* दर महिन्याच्या ९ तारखेला अति जोखमीच्या मातांची तपासणी

मिळणारी विविध औषधे
* साथीचे रोग, * क्षयरोग, * उच्च रक्तदाब, * मधुमेह, * जुलाब उलट्या,
* बालकांच्या लस * श्वान व सर्पदंशावरील लस* व्यसनमुक्ती तसेच मानसिक आजारांवरील गोळ्या.

कर्मचारी वर्ग
वैद्यकीय अधिकारी........ ४
आरोग्य सहायक... ३
आरोग्य सहाय्यिका....१
औषध निर्माण अधिकारी.... १,
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी....१
परिचर.... ३,
वाहनचालक....१,
आरोग्य सेवक..५,
आरोग्य सेविका..... ७, लिपिक...१,
संगणक परिचालक.....१.


02195

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com