आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासींना ड्रम वाटप

आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासींना ड्रम वाटप

फुलवडे, ता. ३० : आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांना रोलिंग ड्रमचे वाटप केल्याची माहिती शाश्वत संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश राजवाडे यांनी दिली. बोरघर (ता. आंबेगाव) येथील आनंद कपूर प्रशिक्षण केंद्र, जुने आंबेगाव येथील शाश्वत संस्था, मंचर यांच्यावतीने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया पुणे, मर्सिडीज बेंझ चाकण, केळकर ॲटो पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या आर्थिक सहकार्याने हे ड्रम वाटप केले आहे.

आदिवासी डोंगराळ भागात राहणाऱ्या कुटुंबांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागते यामुळे महिलांना भर उन्हात खूप परिश्रम घेऊन पाणी आणावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतात. हे कष्ट कमी व वेळ वाचावा यासाठी उपाययोजना म्हणून पाणी आणण्यासाठी रोलिंग ड्रमचे वाटप केले असल्याचे सांगून संस्थेच्या विविध प्रकल्पांविषयीची माहिती शाश्वत संस्थेचे कोषाध्यक्ष अशोक आढाव यांनी उपस्थितांना दिली.

याप्रसंगी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे अधिकारी नीलेश कोळमकर, बाजीराव पाटील, शाश्वत संस्थेच्या विश्वस्त सुलोचना गवारी, कार्यकर्ते तसेच विविध गावातून आलेले लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वस्त प्रतिभा तांबे यांनी केले तर आभार कृष्णा वडेकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com