प्राणी गणना करण्यात धुक्याचा अडथळा

प्राणी गणना करण्यात धुक्याचा अडथळा

फुलवडे, ता. ७ : भीमाशंकर अभयारण्यात पाच मे बौद्धपोर्णिमेनिमित्त प्राणी गणना करण्यात आली. परंतु पाऊस व दाट धुक्यामुळे प्राणी गणना करताना अडथळा निर्माण झाल्याने पानवठ्यांवर प्राण्यांची संख्या कमी दिसून आल्याची माहिती भीमाशंकर अभयारण्य क्र. १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.
उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाशमान असलेल्या बौद्धपोर्णिमेला दरवर्षी भीमाशंकर अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी भीमाशंकर अभयारण्यातील वाजेवाडी, घाटघर, चौरा क्र. १, उघडी कळमजाई, चौरा क्र. २, तीरतळे, कारवीचा दरा, भाकादेवी या आठ पाणवठ्यांवर २० वनकर्मचारी व २० वन्यजीव प्रेमी अशा एकूण ४० जणांना बसविण्यात आले.
इतर ठिकाणांवरून आलेल्या निसर्गप्रेमींनी पाणवठ्यांवर तयार केलेल्या मचाणमध्ये (लपन) बसून रात्री पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश, रातकिड्यांचा आवाज, रात्री पडणारी थंडी यातून निसर्गानुभव घेत वन्यप्राण्यांचे निरिक्षण केले. त्यामध्ये सांबर, रानडुक्कर, ससा, भेकर, मोर, उदमांजर, घुबड आदी प्राणी, पक्षी प्रत्यक्षात पाहिले.
भीमाशंकर अभयारण्य हे घाटमाथ्यावर असल्याने येथे पाऊस व धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी गणना करताना अडथळा आला. त्याचप्रमाणे पाऊस झाल्याने जंगलामध्ये ठिकठिकाणी प्राणी असल्याने पाणवठ्यावर प्राणी व पक्ष्यांची संख्या कमी दिसून आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

02248

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com