
माळीण येथे संयुक्त जयंती महोत्सव
फुलवडे, ता. १८ : ‘‘महामानवांच्या कार्यातून आजच्या तरुण पिढीने आदर्श घेऊन आपल्या भागात कार्य करायला हवे,’’ असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
माळीण (ता. आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘माळीण येथील शाळेसाठी ३ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य, माळीण-पोटेवाडी येथे साकव पुलासाठी ७५ लाख रुपये, पसारवाडी येथे ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ताचे काम मंजूर असून, साकव पुलाचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल.’’
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक अंकुश हे होते. याप्रसंगी आरपीआय आठवले गटाचे सरचिटणीस गौतम सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवाजी राजगुरू, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, अभिनेत्री ऐश्वर्या दौड, अभिनेते आदित्य राजे मराठे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी समता मित्र मंडळ व पँथर मनोहर अंकुश प्रतिष्ठान यांच्या वतीने आदिवासी भागात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाश्वत संस्था जुन्नरचे अध्यक्ष बुधाजी डामसे, तुकाराम लेंभे, बाळासाहेब जढर, डॉ. नेहा गडदे, निसर्गमित्र धनंजय कोकणे, दिनकर गायकवाड, रोहन अंकुश व आशाताई खरात यांना आढळराव पाटील यांच्या हस्ते आंबेगाव भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सरपंच रघुनाथ झांजरे, संगीता किर्वे, रामदास भोकटे, सुरेश किर्वे, काळू जढर, संदीप बाणखेले आदी उपस्थित होते. जयंतीचे आयोजन जगन्नाथ अंकुश, अरुण अंकुश, राजेश अंकुश, देविदास अंकुश यांनी केले. प्रा. प्रकाश अंकुश यांनी प्रास्ताविक; तर अमोल अंकुश यांनी सूत्रसंचालन केले.