भीमाशंकर येथे हरिनाम सप्ताह उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भीमाशंकर येथे हरिनाम सप्ताह उत्साहात
भीमाशंकर येथे हरिनाम सप्ताह उत्साहात

भीमाशंकर येथे हरिनाम सप्ताह उत्साहात

sakal_logo
By

फुलवडे, ता. १९ ः श्री क्षेत्र भीमाशंकर येथे वै. सदगुरू भंगाळे बाबा कार्य गौरवानिमित्त तिसरा फिरता अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ९ मे ते १६ मे २०२३ या कालावधीत संपन्न झाल्याची माहिती श्री क्षेत्र भीमाशंकर धर्मशाळा मंडळाचे अध्यक्ष यशवंत महाराज मोहरे यांनी दिली.
या फिरत्या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन दरवर्षी विविध धार्मिक ठिकाणी केले जात असून यावर्षी हा सप्ताह श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते १२ श्री ज्ञानेश्वरी पारायण, ४ ते ५ प्रवचनसेवा, ६ ते ७ हरिपाठ व ७ ते ९ कीर्तनसेवा असा दिनक्रम होता. मंगळवारी विश्वनाथ महाराज खटिंग यांच्या काल्याच्या किर्तनसेवेने सप्ताहाची सांगता झाली.
याप्रसंगी वारकरी संप्रदायातील मान्यवरांना राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर वारकरी मंडळाचे अध्यक्ष चिंतामण महाराज भारमळ, दत्ता महाराज दांगट, मनोहर महाराज गवारी, लहू महाराज आढारी, माऊली महाराज तिटकारे, एकनाथ महाराज गवारी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
सप्ताह कार्यक्रमात बालयोगी गणेश महाराज, रघुनाथ महाराज थोरात, शाहीर भीमराव ठोंगिरे, दगडू महाराज गवारी, सतीश फुलसुंदर तसेच भीमाशंकर परिसरातील वारकरी, भाविक उपस्थित होते.