डिंभे धरणात १५ टक्केच पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंभे धरणात १५ टक्केच पाणीसाठा
डिंभे धरणात १५ टक्केच पाणीसाठा

डिंभे धरणात १५ टक्केच पाणीसाठा

sakal_logo
By

फुलवडे, ता. २९ : हुतात्मा बाबू गेनू जलाशय, डिंभे धरणामध्ये (ता. आंबेगाव) आजपर्यंत (ता. २९) १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सिंचन व पिण्यासाठी धरणातून पाण्याची आवर्तने सुरू आहेत. त्यातच वाढलेली उष्णता व बाष्पीभवनाने धरणातील पाणीसाठा खालावत आहे. यामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील गावे व वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

आदिवासी भागातील नागरिकांवर पाऊस जास्त लांबू नये अशीच प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील फुलवडे, आंबेगाव, बोरघर, वचपे, पंचाळे, अडिवरे, कुशिरे, म्हाळुंगे, पाटण आदी गावांमधील शेतकरी उन्हाळ्यात गाळपेर पिके घेत असतात. मात्र, सध्या पाणी टंचाईमुळे पिके सुकू लागली आहेत.

पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पात डिंभे, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जागा, येडगाव ही ५ प्रमुख धरणे असून त्यापैकी डिंभे धरण हे सर्वात मोठे आहे. या प्रकल्पातून पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सात
तालुक्यातील ४६ गावांतील १४१२९.२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

विहिरी, कूपनलिकांनी गाठला तळ
पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे पाणलोट क्षेत्रातील बुडीत बंधारे, तळी, शिवकालीन पाण्याच्या टाक्या, विहिरी, कूपनलिका, हातपंप या पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे.


ओलीतालील क्षेत्र (४६ गावे).... १४ हजार १२९.२५ हेक्टर
प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा...... १४.८१ (४.३९६ दलघफू)

कुकडी प्रकल्पातील धरणांचा २९ मेपर्यंतचा पाणीसाठा
डिंभे..... १५.०५ टक्के (१.८८० दलघफू)
माणिकडोह.....५.०६ टक्के (०.५१४ दलघफू)
वडज... १४.०५ टक्के (०.१६४ दलघफू)
पिंपळगाव जोगा.....१९.६४ टक्के (०.७६४ दलघफू)
येडगाव...... ५५.१४ टक्के (१.०७१ दलघफू)


02286