शेकरू पर्यटन केंद्राचे निगडाळेत उद्या उद्‌घाटन

शेकरू पर्यटन केंद्राचे निगडाळेत उद्या उद्‌घाटन

फुलवडे ता. ३१, निगडाळे (ता. आंबेगाव) येथील म्हतारबाची वाडी येथे शेकरू पर्यटन केंद्राचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ५ वाजता व आहुपे (ता. आंबेगाव) येथे देवराई पर्यटन केंद्राचे उद्‌घाटन शनिवारी (ता. ३) सकाळी १० वाजता ग्लोबल नेचर फंड, जर्मनीचे थीस गीर्रट्झ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शाश्वत संस्था मंचरचे कोषाध्यक्ष अशोक आढाव यांनी दिली.
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ३० कुटुंबांकरिता रोजगार निर्मिती व त्यांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने शाश्वत संस्था मंचर, कळमजा माता महिला बचत गट आहुपे व माता वरसूबाई महिला बचत गट, म्हतारबाची वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या पर्यटन केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याचे आढाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com