
जांभोरीत शैक्षणिक साहित्य वाटप
फुलवडे, ता. ६ ः जांभोरी (ता. आंबेगाव) येथील नांदूरकीची वाडीतील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप, दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त व शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्यांचा सत्कार समारंभ झाल्याची माहिती ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव केंगले यांनी दिली.
पाच जिल्हा परिषद व एक माध्यमिक विद्यालयातील पहिली ते दहावीतील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामध्ये दप्तर, ६ वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल यांचा समावेश होता. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांत केंगले व पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय गिरंगे यांचा त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या राजू किर्वे, सागर भोकटे, अक्षय केंगले, पांडुरंग पारधी, किरण केंगले, अविनाश केंगले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी श्रीकांत शिंदे, प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक मारुती मेदेवाड हे होते. याप्रसंगी मुख्याध्यापक लक्षण घोटकर यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी अंकुशराव केंगले, लक्ष्मण केंगले, जगदीश केंगले, शरद बांबळे, चंद्रकांत लोहकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, पोलिस पाटील नवनाथ केंगले, माजी सरपंच संजय केंगले, खरेदी विक्री संघाचे श्यामराव बांबळे, ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी, दिलीप गिरंगे, ज्ञानेश्वर केंगले, मुख्याध्यापक मारुती पारधी, काळू केंगले, संजय केंगले, बाळू मडके व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक शंकर भवारी यांनी, सूत्रसंचालन किसन गिरंगे यांनी केले. तर आभार सुनील गिरंगे यांनी मानले.
02319